Friday, 8 January 2021

 मा . मुख्याध्यापक (सर्व ) जि प व खाजगी शाळा

                                                                                                         जा क्र/के प्रा शा आमठाणा

                                         दिनांक : 03 /08 /2020

प्रति ,

   मा . मुख्याध्यापक (सर्व ) जि प व खाजगी शाळा

      जि.प.कें.प्रा.शा .आमठाणा  ता सिल्लोड जि.औरंगाबाद .

   विषय :  शैक्षणिक वर्ष 2020 -21 शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्यासाठी वर्क फ्रॉम होमं  राबविणे  बाबत

   संदर्भ :- शासन निर्णय, 15 जून 2020 आणि 22 जुलै 2020.

            उपरोक्त संदर्भीय शासन आदेशानुसार आपणास सूचित करण्यात येते कि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद आणि जिल्हा गुणवत्ता कक्ष औरंगाबाद यांनी केलेल्या नियोजनानुसार मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने   आपल्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना शैक्षणिक कार्यशाळा घेऊन सदर नियोजन सर्वांना अवगत करून देण्यात आले आहे.

              त्यानुसार आपणास सूचित करण्यात येते की, शासन निर्णय आणि शैक्षणिक दिनदर्शिका याप्रमाणे शाळेतील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी 100% विद्यार्थ्यपर्यंत पोहोचण्यासाठी व केंद्रस्तरीय कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी  जे काही पूरक शालेय उपक्रम राबवायचे आहेत याची कल्पना आपणाला दिलेली आहे .हे सर्व आवश्यक उपक्रम  काटेकोरपणे राबविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक म्हणून आपणावर निश्चित करण्यात येत आहे तरी आपण याची नोंद घ्यावी.विविध शालेय उपक्रम कोणी आणि केव्हा करावे याची माहिती सोबत कृती आराखडा मद्ये सविस्तरपणे देण्यात येत आहे .तसेच दररोज  group व मेल वर देण्यात येणार आहेत .त्याची प्रभावी अमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोद घ्यावी

                                                                            

                                                           केंद्रप्रमुख

                                              जि.प.कें.प्रा.शा .आमठाणा

No comments:

Post a Comment